मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, January 4, 2024

अवैध गर्भपात सेंटरचा अड्डा उदवस्थ ; जिल्हा शल्यचिकीत्सक यांचा पथकाची गेवराईत कार्यवाई

Share it Please
अवैध गर्भपात सेंटरचा अड्डा उदवस्थ ; जिल्हा शल्यचिकीत्सक यांचा पथकाची गेवराईत कार्यवाई 


एक महिला (मनीषा सानप) व घरमालक (बबन चंदन शिव) त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले

गेवराई दि 4 ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर परिसरात एका किरायच्या घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे व त्यांच्या टिमने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला तसेच या कार्यवाईत गर्भपात करनारी सामग्री व विविध मशीन सह मालकाला व एक महिला हीला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैधकीय अधिक्षक यांच्याकडे प्राप्त झाली त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? याबाबद बीड जिल्हा शैल्यचिकीत्सक यांनी डमी महिला तयार करून सदर फोन करूण याची पुष्टी केली तसेच या प्रकरणी बीड स्थानिक गून्हे शाखा व वैधकीय पथक यांनी सदर ठिकाणी ( दि 4 रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला व याठिकाणी एक महिला व घरमालक त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे तसेच याठिकाणाहून सोनाग्राफी मशीन व गर्भपात करनारी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाई सूरु असुन आरोपी महिला ही नर्स असुन तिच्यावर काही महिण्यापुर्वी असा गून्ह्यासंदर्भात कार्यवाई करण्यात आली होती जामिनवर सुटल्यानंतर तिने हा व्यावसाय परत सुरू केला असल्याचे समजले तसेच मनिषा सानप व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कार्यवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे,स पो नि सुरेखा धस,प्रतिभा चाटे, मनीषा राऊत, चंदा मुळे, वैध्यकीय अधिक्षक मोहम्मद नोमाणी,डॉ गोपाल रांदड ,डॉ राजेश शिंदे सह अन्यजन या कार्यवाईत सहभागी होते.





18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023