अनुकंपाभरती बाबत सखोल चौकशी करावी व अनुकंपाधारकांना न्याय मिळवुन देण्यात यावा या साठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण.
जिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यस्ती करून उपोषण सोडले आपणास लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन दिले.
गेवराई नगर परिषद मध्ये अनुक्रमे 1. नाका कारकुन, 2. फायरमॅन, 3. नाका कारकुन व 4. ड्रायव्हर या पदावर कार्यरत होते. नगर परिषदमध्ये कार्यरत सेवा बजावत असताना त्यांचा अकाली मृत्यु झाला असुन, त्यांच्या जागेवर आम्ही अनुकंपासाठी गेवराई नगर परिषदेला अर्ज केले आहेत. अनुकंपाधारक म्हणुन आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सुध्दा आजमितीस आम्हाला चौदा पंधरा वर्षाहुन अधिक वर्ष झाले आहेत.
गेवराई नगर परिषदेने आमची ज्येष्ठता तसेच अनुकंपा यादिमध्ये आमचे पहिले क्रमांक असताना सुध्दा आम्हाला डावलुन इतर 5 जणांना 01 ऑगस्ट 2023 रोजी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये 1. ज्योती नितीन दाभाडे 2. देवानंद अशोक चौधरी 3. सुरेश रुस्तुम कणसे 4. आदिल खान बशीर खान पठाण आणि रोजंदारी कर्मचारी 5. मंहमंद नसीरोदिदन अजिम 6. नंदुरबारचा रोजदारी कर्मचारी 21 सप्टेंबर 2022 रोजी वळवी किसन मन्साराम यांना आमच्यापेक्षा ज्येष्ठता नसतानासुध्दा आम्हाला डावलुन नियुक्तीचे आदेश दिले असल्या कारणाने आमच्यावर अन्याय झाला आहे. यानंतर आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला असेहि सांगितले कि, रिक्त जागा नसल्यामुळे तुमचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहे. तुम्ही तेथे पाठपुरावा करावा. आम्हि वांरवार नगर पालिका प्रशासन बीड मधिल संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन सर्व बाबी सविस्तर सांगुनहि आम्हाला आजपर्यंत ऑर्डर दिली गेली नाहि. व सांगण्यात आले कि, बीड जिल्हयातील इतर नगर पंचायत, नगर परिषद यांनी 100 बिंदु नामावली झालेली आहे. पण बीड नगर परिषदेची 100 बिंदुनामावली न दिल्यामुळे आपल्याला नियुक्ती देता येत नाहि. पुढे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथील न.प. आस्थापना विभागप्रमुख डॉ. बि. डी. बिक्कड साहेब यांना आमच्या नियुक्ती बददल चौकशी केली असता, ते असे उत्तर देतात कि, कमिश्नर ऑफिसमधिल बीड नगर पालिकाचे 100 बिंदु नामावली रोस्टरमध्ये काहि त्रुटि आहेत.असे मोघम उत्तर देऊन, पंधरा दिवस थांबा, महिनाभर थांबा, असे बोलुन बोलुन आमचे एक वर्ष निघून गेले आहेत. तरिही आमच्या कामाबद्दल काहि प्रगती अथवा आवश्यक कार्यवाही झालेली नाही.
अनुकंपाभरती बाबत सखोल चौकशी करावी व अनुकंपाधारकांना न्याय मिळवुन देण्यात यावा. आम्ही अनुकंपाधारक नौकरीच्या प्रतिक्षेत आज जवळपास 14-15 वर्षाहुन अधिक काळ लोटलेला आहे. या कारणाने आमचे वय मर्यादा निघुन चालले आहे. नगर पालिका प्रशासनाला आता पर्यंत वारंवार 20 ते 30 अर्ज केलेले आहेत. तरी मे. साहेबांनी आमच्या अर्जाचा कसलाहि विचार केलेला नाही. आमची घरची परिस्थिती गरीबीची व हलाकिची आहे. या सर्वांचा विचार करुन, मे. साहेबांनी 26 जानेवारी 2024 च्या अगोदर आम्हाला नियुक्ती देण्याची तारीख निश्चित करावी. व आम्हाला लेखी आश्वासन देण्यात यावे. नसता आम्ही सर्वजण चकरा मारु मारु जिवाला कंटाळलो आहे. या कारणाने आम्ही सर्व चारही अर्जदार प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 2024 रोजीपासुन जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आमरण उपोषण करणार आहोत. आमच्या जिवाला काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व अधिकारी यांची राहिल, याची नोंद घ्यावी.अशी निवेदनात म्हटले आहे.