जुन्या भांडणाचे कारण काढत एकावर शस्त्राने केले वार?
गेवराई :- गेवराई तालुक्यातील ताकडगाव या गावात जुन्या भांडणाचे कारण काढुन त्याच्यावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे.या घटनेतील तिन आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेची माहिती अशी कि,अशोक भगवान धुमाळ वय 30 हे शासकीय गायरान परिसरात शौचास गेले होते.तेंव्हा या ठिकाणी प्रभाकर शिनगाडे ,गणेश शिनगाडे व हरी भिसे हे या ठिकाणी आले व अशोक धुमाळ यांना गाठुन जुन्या एका भांडणाचे कारण काढत वाद घालु लागले. हळूहळू या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, प्रभाकर शिनगाडे व सोबत आलेल्या गणेश शिनगाडे व हरी भिसे यांनी अशोक धुमाळ यांना मारहाण तर केलीच परंतु ते एवढयावरच थांबले नाहीत तर अशोक धुमाळ यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला. यामुळे अशोक धुमाळ हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अशोक धुमाळ यांनी गेवराई पोलीस स्टेशनला प्रभाकर शिनगाडे, हरी भिसे व गणेश शिनगाडे विरुद्ध तक्रार दिली आहे,गेवराई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.