मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Sunday, January 28, 2024

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगें पाटलांना , आँन ड्युटी मदत करणार्या सुमंत भांगेचा सुनिल सुरवसेंनी केला सत्कार

Share it Please
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगें पाटलांना , आँन ड्युटी मदत करणार्या सुमंत भांगेचा  सुनिल सुरवसेंनी केला सत्कार !
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी सारख्या छोटयाशा खेडयातील मनोज जरांगे नावाचे योध्दा लढतांना उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर अखंड हिंदुस्तानाने बघितले. शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब संपेपर्यंत मि आरक्षणाचा हा लढा लढणारच, परंतु माघार घेनार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा मराठा आरक्षणाचे प्रमुख चेहरा असणार्या मनोज जरांगे यांनी केली आणी अखेर मनोज जरांगेसह मराठा बांधवांना महाराष्ट्राची राजधानी मुंबईत यश आलेच. परंतु या यशाच्या मागे हजारोअद्रुश्य हात असे आहेत कि त्यांनी या लढयाच्या यशासाठी ईमाने इतबारे काम करुन या लढयाला खरे यश मिळवुन दिले .त्यातीलच एक आहेत आपल्याच बीड जिल्हयातील केज तालुक्यातील सारणी या गावचे सुपुत्र सुमंत भांगे साहेब, सुमंत भांगे बीड जिल्हयाचे सुपुत्र तर आहेतच परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव देखील आहेत. सुमंत भांगे हे  चोवीस तास आँन ड्युटी असणारे अधिकारी असुन सुध्दा मराठा समाजा बद्दलची आस्था आणी आरक्षणाच्या लढयामागची मराठा बांधवाची तळमळ पाहुन मनोज जरांगेना कायम चोवीस तास मदत करणारे अधिकारी म्हणुन सुमंत भांगे यांचे नाव शेकडो भाषणातून दस्तुरखुद्द मनोज जरांगे यांनी देखील घेतले आहे. सामान्य मराठा बांधवांची आरक्षण द्या हि प्रमुख मागणी जरी असली तरी यासाठी कायदेशीर बाबी अत्यावश्यक असतात. सुमंत भांगे यांनी मनोज जरांगे व त्यांच्या टिमला सर्वोतोपरी मदत केल्यामुळे सुमंत भांगे आणी त्यांच्या सारख्या शेकडो लोकांच्या मदतीमुळेच आंदोलनाला यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासाठी आँन ड्युटी चोवीस तास असुनही मदत केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे माजी बीड शहर प्रमुख सुनिल सुरवसे यांनी सुमंत भांगे साहेबांच्या कार्याचे कौतुक करत ह्ददयी सत्कार केला आणी मराठा समाजाला दिलेल्या मदतीसाठी आभार मानले. यावेळी  एकनाथ शिंदे  शिवसेना गटाचे अनेक कार्येकर्तै तथा  नगर सेवक  रमेश चव्हाण हे सुध्दा उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023