मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Sunday, January 7, 2024

जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष ! स्थानीय पदाधिका-यांचे चांगभलं

Share it Please
जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष ! स्थानीय पदाधिका-यांचे चांगभलं
तलवाडा हद्दीत वाळू चोरी सुसाट ! तहसीलदार, पोलीस झोपी गेल्याच्या सोंगेत


तलवाडा जि.प्रतिनिधी - इम्रान सौदागर:-वाळू चोरी हा गेवराई तालुक्यातील महसुल व संबंधित विभाग यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. महिन्याला किमान एक ते दोन कोटी रुपये या अधिकाऱ्यांना अन त्यांच्या बगलबच्यांना मिळत असल्याची तालुक्यात चर्चा आसतांना त्यामुळे वाळूचोरी कडे यातील संबंधित लोकांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. एका एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ते सहा ठिकाणी रोज किमान प्रमाणात गाड्या सुरू आहेत. जिल्हाधिकारी अन एसपी याकडे लक्ष देतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. 
अधिकृत एकही वाळू पट्टा सुरू नसतांना वाळूचा उपसा मात्र सर्रास सुरू आहे. संपूर्ण गोदावरी काठावर वाळूचा उपसा सुरू असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपत पिंपळगाव, पांढरी, बोरगाव थडी  गंगावाडी तपे निमगाव येथे केण्या सुरु आसल्यानचे वाळु चोरांच्या या परिसरातील येरझार व सततच्या वास्तव्यावरुन दिसुन येत आहे. या माध्यमातून रोज किमान ५० ते ६०  हायवा, ट्रक आणि ट्रॅक्टर भरून वाळू काढली जाते. मात्र हा प्रकार ना पोलीसांना दिसतो ना तहसीलदारांना दिसतो. रोज नदीपात्रातून वाळू उपसा करायचा अन रात्री वाळू वाहतूक करण्यात येते. एका गाडीचे किमान पन्नास हजार रुपये महिना अन जास्तीत जास्त दोन लाख रुपये महिन्याला गोळा केले जातात. हा रेट तहसीलदार यांचा वेगळा अन पोलिसांचा वेगळा आसल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर ज्या भागात वाळू विक्री केली जाणार आहे त्या भागातील महसूल अन पोलीस प्रशासनाचे हप्ते वेगळे आसल्याचे बोलल्या जात आहे. महिन्याकाठी दीड ते दोन कोटी रुपये मिळत असल्याने तहसीलदार आणि पोलिसांनी या वाळू माफियांना गोदापात्र मोकळे करून दिले आसल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा एैकावयास मिळत आहे. या वाळूमुळे वाळु चोरटे कर्तव्य बजावणा-या ठरावीक पदाधिका-यांच्या जीवावर ऊठल्याचे आणेक उदाहरण आसतांना जिल्हा पोलिस अधीक्षक व जिलाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष गोदाकाठच्या गाव परिसरात धुरवळा ऊडवत आसल्याने सर्व सामान्यांना खुप मोठ्या दुर्धर आजाराना सामोरे जावे लागत असुन जिल्हा पोलिस मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठजन सामान्य जनाच्या जीवावर ऊठल्याचे बोलल्या जात आहे. शासनाच्या लाखो रुपयाच्या महसूलला चुना लावत अधिकारी मात्र मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. या कडे जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी लक्ष देतील का आसा प्रश्न सर्व सामान्यातुन उपस्थित केला जात आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023