मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, January 30, 2024

धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

Share it Please
धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले 
(बीड) धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने आज बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तलाठी यापदावर निवड झाल्याबद्दल कोमलताई भोंडवे पिठी ता. पाटोदा जि. बीड, पांडुरंग निर्मळ खुंडरस ता. जि. बीड, मनेश चौरे निपानी जळका ता. गेवराई जि.बीड यांचा सन्मान करण्यात आला.

    धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी धनगर समाजातील तलाठी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्काराचे  बीड येथे आयोजन केले होते.यावेळी नारायणजी भोंडवे जिल्हाध्यक्ष बीड, अमोलजी भोंडवे तालुकाध्यक्ष पाटोदा.सूर्यकांत कोकाटे, विठ्ठल कोकाटे, सुदर्शन दादा भोंडवे,प्रा.देवकते सर,कैलास जी पांढरे, दिगंबर जी चादर,परशुराम सापणकर,माऊली गुरव,गोकुळ कंठाळे,शिशिर ढाकणे,गणेश नाटकर,सुखदेव खंडागळे,योगेश घोडके,कोकाटे भैय्या ,भोंडवे भैया आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023