बीडच्या आदित्य काँलेज मधुन विद्यार्थ्यांची मोटार सायकल चोरीला ?
बीड :- सध्या मोटारसायकल चोरांनी आपला मोर्चा शहरातील काँलेज कडे वळवल्याचे दिसत आहे. कारण बीड जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट सुरू झाला असुन, मोटार सायकल चोरीच्या घटना हळूहळू वाढु लागल्या आहेत. आता या चोरांनी बीड शहरातील काँलेजना टार्गेट केले आहे असे दिसत आहे. याबाबत सविस्तर व्रुत्त असे कि , बीड शहरात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग नावाच्या नामांकित काँलेजमध्ये रोहन लहु चव्हाण वय 20 हा विद्यार्थी काँलेजची परिक्षा देण्यासाठी या काँलेजमध्ये आला होता.तो परिक्षा हाँलमध्ये परीक्षेचा पेपर सोडवत असतांना त्याची मोटार सायकल क्रं.एम एच 42 - 8864 ही काँलेजच्या प्रांगणात पार्किंग केली गेली होती.दरम्यान दुपारी 2 ते 5 वाजता रोहण लहु चव्हाण याची मोटारसायकल अज्ञात चोरटयाने चोरुन घेऊन गेला. रोहन जेंव्हा आपला परिक्षेचा पेपर देऊन बाहेर पडला तेंव्हा त्याला आपली मोटारसायकल पार्किंग केलेल्या जागेवर दिसुन आली नाही. त्याने आजुबाजुला आपल्या मोटारसायकल चा शोध घेतला परंतु ती कुठेच दिसेना. आपली मोटारसायकल चोरीला गेली हे मग रोहन चव्हाण या विद्यार्थाच्या लक्षात आले.रोहणने तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठत आपली एम एच 42-8864 ही मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार दाखल केली आहे.पेठ बीड पोलीसांनी अज्ञात चोरटया विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असुन,पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे हे करत आहेत.