पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर हे रुजू होताच त्यांनी गेवराई शहर व हद्दीत गुन्हेगारीवर लगाम घालण्याचे संकेत देत आता गुन्हेगारी मोडीत काढणार आसल्याचे सांगितले.
राञी उशिरापर्यंत चालणाऱ्या दुकानदारांना कडक इशारा
नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या कडून सुरु होणारी दबंग कारवाईमुळे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध धंद्यावाल्यांच्या तंबूत घबराट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गेवराई (प्रतिनिधी ) ;- गेवराई पोलीस ठाणेतर्गंत शहर व गाव हद्दीत पुर्वी खुलेआम अवैध धंद्यांना तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी अर्थपुर्ण व्यवहारारामुळे खुलेआम सुट दिल्याने गेवराईत व हद्दीत गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने यामुळे वाढत होता.आता गेवराई पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर हे रुजू होताच त्यांनी गेवराई शहर व हद्दीत गुन्हेगारीवर लगाम घालण्याचे संकेत देत आता गुन्हेगारी मोडीत काढणार आसल्याचे सांगितले. राञी उशिरा पर्यंत शहरासह ठाणेतर्गंत चालणा-या दुकानदारांविरुध्द कडक कारवाई करणार आसल्याचे सांगत या ठाणे हद्दीतील गोदावरी नदी पाञातून ज्या गावामधून अवैध `वाळू उपसा व चोरी करणा-या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येऊन या वाळू चोरीवर देखील लगाम घालत वाळू चोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे पाऊले उचली जातील असे नवनिर्वाचित गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान त्यांची आता सुरु होणारी दबंग कारवाईमुळे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध धंद्यावाल्यांच्या तंबूत घबराट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गेवराई पोलीस ठाण्याचे पुर्वीचे पो. नि. धनंजय फराटे यांच्या कार्यकाळात खुलेआम व राजरोसपणे गेवराई ठाणेतर्गंत अर्थपुर्ण व्यवहार करुन अवैध धंद्यानी हौदोस घालत गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत गेले.राञी अपरात्री गोदावरी नदी पाञातून चोरी होणारी वाळू त्यांच्या काळात खुलेआम दिवसा देखील सुरु झाली होती. दरम्यान आता गेवराई पोलीस स्टेशनला खमक्या आधिकारी आला असुन पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी नुकताच पदभार घेत प्रथमता त्यांनी गेवराई पोलीस ठाणेतर्गंत असलेल्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी उपाय योजना आता आखल्या आहेत.पहिल्याच इंन्ट्रीत त्यांनी पाडळसिंगी येथील कुंटणखाण्यावर छापा मारत बाहेर जिल्ह्यातील पाच महिला सुटका करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या त्यांच्या पहिल्याच इंन्ट्रीत गेवराईतील अवैध धंदे चालविणारे व विशेषता वाळू चोरी करणा-या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांनी गेवराई हद्दीतील गुन्हेगारी व अवैध वाळू चोरीवर लगाम घालण्यासाठी उपाय योजना आखल्या असुन राञी उशिरापर्यंत चालणा-या हॉटेल धारकाविरुध्द कडक कारवाया करण्याच्या सुचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय सर्वात जास्त वाळू उपस्यापायी गोदावरी नदी पाञातून गुन्हेगारी वाढत असुन अशा ठिकाणी स्वत: जाऊन वाळू माफियांविरुध्द कडक कारवाया करण्याचा इशारा माफियांना प्रविणकुमार बांगर यांनी दिला आहे.तसेच शहरातील बेशिस्त वाहतुक, दुचाकी, चारचाकी, पॉकिटमार,महिलांच्या गळ्यातील सोनं, मोबाइल चोर, भुरट्या व अन्य घरफोड्या करणाऱ्या चोरांविरुध्द लगाम घालण्यासाठी राञीची गस्त वाढविणे व दिवसभर व्यापारपेठत संशयितित्या फिरणाऱ्या विरुद्ध सध्या गणवेषातील पोलीसांची नजर ठेवून त्यांचा बंदोबस्त करणार आहेत. एकदंर पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी गेवराईतील गुन्हेगारीवर लगाम व पोलीसांची वचक बसविण्यासाठी उपाय योजना केल्याने आता नक्कीच अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणार असुन येणाऱ्या काळात त्यांच्या तंबूत घबराट होणार आसल्याचे यावरुन दिसन येत आहे.