जामिन करूण घेण्यासाठी आलेल्या ईसमाला न्यायालय परिसरात मारहान
गेवराई न्यायालयाच्या आवारातील धक्कादायक प्रकार
गेवराई दि १० ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी घरघूती हिसांचार प्रकरणात दाखल असलेल्या गून्ह्यात जामिन घेण्यासाठी आलेल्या ईसमाला न्यायलय परिसरात मारहाण झाली तसेच विषेश बाब म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडली आहे एकही पोलिसांनी साधी यात मध्यस्ती केली नाही तसेच या प्रकराचा व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,संदिप राठोड व त्यांची आई आणि भाऊ असे तिघे मिळून त्यांच्यावर दाखल असलेल्या 498 प्रकरणात गेवराई न्यायालयात जामिन घेण्यासाठी आले होते परंतू ते न्यायलयात येण्यापुर्वीच बाहेर असनाऱ्या पार्किंग परिसरात फिर्यादी कडील लोकांनी त्यांना गाडीतच मारहान करण्यास सुरूवात केली त्याठिकाणी अनेक लोक जमले होते त्याठिकाणी नियुक्त असनारे पोलिस त्यांच्या समोर तिन व्यक्तीला जबर मारहान होत होती यात साधी पोलिसांनी मधस्थी देखील केली नाही तसेच गेवराई पोलिस ठाण्यात असनाऱ्या एका पोलिस कर्मचारी यांचे नातेवाईक मारहान करनारी मंडळी होती अशी माहिती आहे त्यानंतर मारहान झालेल्या व्यक्ती गेवराई पोलिसांत गेला असता त्याला तिन तास त्याठिकाणी गून्हा दाखल करण्यास बसाव लागलं तसेच मारहान झालेल्या व्यक्तीच्या तोंडातील दात देखील पडले आहेत व केवळ थातूरमातूर कार्यवाई करून पोलिसांनी हे प्रकरण शांत केले आहे तसेच अश्या घटनेला मनोबल वाढवविण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याने आता न्यायालय परिसरात असे प्रकार घडले तर काही नवल वाटू नये