हरेश मंघारामाणी यांची सिंधी समाज मिशनच्या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती
गेवराई (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध कापड व्यापारी आणि व्यापारी संघटनेचे सहसचिव तथा योगसाधक हरेश घनश्यामदासजी मंघारामाणी यांची सिंधी समाजाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अमर शहीद संत कंवरराम मिशनच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढील दोन वर्षासाठी असून अमरावतीचे नानक आहुजा आणि बीड सिंधी पंचायतचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी चे सदस्य डॉ. एम. बी. जेसवानी यांनी एका पत्राद्वारे केली आहे
७ जानेवारी रोजी एस. एस. डी. मंडल दुर्गा माता रोड, जालना येथे आयोजित संमेलनात हे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई, पूज्य सिंधी पंचायत जालना व भारतीय सिंधी सभा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शामसेठ पंजवाणी महेश सुखराम जी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, अमित शर्मा सदस्य, जालना सिंधी पंचायत, सुखदेव बजाज सचिव जालना सिंधी पंचायत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली .
हरेश मंघारामाणी यांची सिंधी समाज मिशनच्या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बदल रईस सायकल मार्ट येथे यथोचित सत्कार करण्यात आले
या वेळेस सतीश दाभाडे, अमित शिखरे, राम मोटे, प्रा. राजेंद्र बरकसे, अनिल पवार, किरण येवले ,शेख रईस, अल्ताफ कच्ची, राधेश्याम येवले(मा.नगरसेवक),वाजेद ताबोळी,मनोहर चाळक सह गेवराई सिंधी समाज, सतीशदादा दाभाडे मित्र परिवार उपस्थित होते.