मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, February 15, 2024

गेवराई:-शंभर हायवा सोडून एक केनीवर तहसिलदार यांची कार्यवाई

Share it Please
शंभर हायवा सोडून एक केनीवर तहसिलदार यांची कार्यवाई

वाळू उपसा रोखण्यात तहसिलदार संदिप खोमणे अपयशी 

गेवराई दि 15 ( वार्ताहार ) तालुक्यातील म्हाळजपिंपळगाव परिसरात गस्तीवर असनाऱ्या तहसिलदार संदिप खोमणे व त्यांच्या टिमने एक केनीवर कार्यवाई केली असल्याची माहिती असुन या कार्यवाईत एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच याप्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

   याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या तिन दिवसांपासुन गोदापात्रात वाळू माफियांनी नंगानाच सुरू केला आहे पोकलेन,जेसिबी,रोडट,हायवा या आदी सामग्री ने राजरोजपणे अनाधिकृत वाळू उपसा सुरू आहे स्टॉक टेंडरच्या नावावर हा सगळा प्रकार सुरू आहे तसेच ज्याठिकणचा वाळू साठा उचलण्याची परवानगी आहे ते ठिकाण सोडता ईतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे गेवराई तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यात तहसिलदार संदिप खोमणे हे अपयशी ठरले आहेत तसेच राक्षसभूवनच्या गोदापात्रात केनीची वसुली करणारा महादू नामक कोतवाल कोण?यांचा शोध महसुलचे प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी घ्यावा तसेच आज सकाळी नऊच्या दरम्यान म्हाळजपिंपळगाव याठिकाणी किती अनाधिकृत हायवा गेवराईच्या तहसिलदार संदिप खोमणे यांनी सोडल्या व एक केनीवर कार्यवाई केली आहे यात एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कार्यवाई तहसिलदार संदिप खोमणे,मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले,पुर्षोत्तम आंधळे,तलाठी किरण दांडगे,कोतवाल शूभम गायवाड यांनी केली आहे

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023