मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, February 24, 2024

एक हजार ब्रास वाळू साठा चोरीला;चकलांबा ठाण्यात गून्हा दाखल

Share it Please
एक हजार ब्रास वाळू साठा चोरीला;चकलांबा ठाण्यात गून्हा दाखल
पांडू चोर शोधण्याचे पोलिसांसमोर अवाहन 

गेवराई दि 24 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात वाळू माफियांनी नंगानाच चालविला असतांनाच आता गेवराई महसुलने देखील वाळू माफिया विरोधात कबंर कसली असल्याचे दिसुन येत असुन एक हजार ब्रास वाळू चोरीला गेली असल्याची तक्रार राक्षसभूवन सज्जाचे अतिरीक्त पदभार असलेले तलाठी किरण दांडगे यांनी याबाबद चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल केला असुन पांडू चोर शोधण्याचे अवाहन आता चकलांबा पोलिसांवर आहे.
तसेच ( दि 23 रोजी) रात्री उशीरा या प्रकरणी तलाठी किरण दांडगे यांनी गून्हा दाखल केला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन दिवसांपासुन गेवराई महसुलचे पथक राक्षसभूवन परिसरात पाहणी करत आहे तसेच राक्षसभूवन गणपती मंदिर परिसरातून एक हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली आहे तसेच अंदाजे सहालक्ष रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्याद जरी महसुल प्रशासनाने आज्ञात व्यक्तीविरोधात दिली असली तरी याठिकाणी सक्रीय वाळू चोर पांडू याला चकलांबा पोलिस अटक करणार का?असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तसेच राक्षसभूवन परिसरात आणखी सहा ठिकाणी वाळू चोरी होते यामध्ये महसुल प्रशासन गून्हा दाखल करणार का?तसेच ज्या शेतकरी यांनी वाळू माफियांना जाण्यास आपल्या शेतातून रस्ता दिला तसेच ते प्रत्येक हायवा कडून एक हजार रूपये घेतात यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकणार का? तसेच वाळू चोरी कोण?करतंय यांची कल्पना स्थानिक महसुल अधिकारी यांना असुन नावानिशी फिर्याद दाखल करवी अशी अपेक्षा महसुल प्रशासनाकडून आहे. तसेच या प्रकरणी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांना संपर्क केला असता अश्या वाळू चोरांची गय केली जाणार नाही तसेच प्रशासन या विरूद्ध कायदेशीर कडक कार्यवाई करेल असे त्यांनी सांगितले.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023