राक्षसभूवनमध्ये आठ वर्षिय मुलींवर अत्याचार
दोन आरोपी विरूद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू
गेवराई दि 2 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन येथील रहिवासी असनाऱ्या एका आठ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गावातीलच परिसरात राहणाऱ्या दोन नराधमांनी सदरच्या आठ वर्षाच्या मुलींला एकटे पाहून तिच्यावर गैरकृत केले असल्याची घटना उघडकीस आली आहे तसेच आरोपीनी फिर्यादी यांच्या नातेवाईकावर दबाब आनला होता अशी प्राथमिक माहिती आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा डीपीआय चे लॉयर फोरचे प्रदेश अध्यक्ष विधिज्ञ सोमेश्वर कारके यांनी सदर घटने विषयी तात्काळ पोलिस प्रशासनाला कळवून फियार्दी यांना चकलांबा पोलिस ठाण्यात आनले व त्यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असुन आरोपी फरार आहेत आरोपींना शोधण्यासाठी चकलांबा पोलिसांची टीम रवाना झाली असल्याचे चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी सांगितले आहे.