गूटखा माफिया दादा जाधवला अभय कुनाचे
पोलिसांना भर दिवसा गूटख्याची तस्करी दिसत नाही का?
गेवराई दि 15 ( वार्ताहार ) गेवराई शहरातील शिवाजी चौकात असनाऱ्या ओम ज्ञानेश ट्रेर्डसच्या दूकानातून खुलेआम गूटख्याची तस्करी करनारा दादा जाधव पोलिसांना दिसत नाही का?याला अभय कूनाचे आहे यावर गेवराई पोलिस कार्यवाई करण्याची हिंमत दाखवनार का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,नुकताच संभाजी नगरच्या हर्सूल कारागृहातून जामिनवर बाहेर असलेला तसेच दहा पेक्षा जास्त गूटख्याचे गून्हे दाखल असलेला पोलिस रेकॉर्डवरील दादा जाधव याला किती दिवस गेवराई पोलिस संरक्षण देनार यांच्यावर कार्यवाई कधी करनार तसेच गेल्या दोन दिवसापुर्वी जालन्यातून गेवराईकडे एक कंन्टेनर येत होता ज्याचा क्रमांक एम 14 जी पी 9730 हा आयशर गोंदी पोलिसांनी पकडला व यामध्ये 14 लाखांचा गूटखा जप्त करण्यात आला आहेत तसेच या प्रकरणात दादा जाधवचा हात आहे का?हे तपासणे गरजेचे आहे भर दिवसा लाखों रुपयांचा गूटखा गेवराई शहरातील शिवाजी चौकात बसून विक्री करनारा हा पोलिसांना माहिती नाही का? यामध्ये कूनाचे हात ओले होत आहे म्हणून यावर कार्यवाई होत नाही अशी चर्चा संपुर्ण परिसरात सुरू आहे.