मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, March 19, 2024

सराफा व्यापारी याला लूटनारी टोळी एका तासांत पकडली;तलवाडा व गेवराई पोलिसांची संयुक्त कामगिरी

Share it Please
सराफा व्यापारी याला लूटनारी टोळी एका तासांत पकडली;तलवाडा व गेवराई पोलिसांची संयुक्त कामगिरी



गेवराई दि 19 ( वार्ताहार ) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील मनूबाई जवळा परिसरातून एक सराफा धनसांवगी याठिकाणी व्यापारासाठी जात असतांना मनूबाई शिवारात त्याला तिन ईसमांनी लुटले घटनेची माहिती तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके व गेवराई पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष जंजाळ ,व सपोनि दिपक लंके  यांनी एका तासांत मुसक्या आवळल्या असल्याची माहिती असून ही घटना आज ( दि 19 मार्च ) रोजी नऊ च्या दरम्यान घडली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, व्यापारासाठी सराफा व्यापारी तलवाडा परिसरातील मनूबाई जवळा या मार्गे घनसांवगी याठिकाणी जात होता रस्त्यातच तिन चोरटे त्यांचा धबा धरूण बसले होते याला हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील लाखों रूपये किंमतीचे सोने चांदी यासह रोख रक्कम पोबारा करण्यात यश आले संबधीत व्यापारी याने तात्काळ तलवाडा व गेवराई पोलिसांना याबाबद माहिती दिली तसेच तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके व गेवराई पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष जंजाळ व सपोनि दिपक लंके यांनी एका तासांत तिन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून शिवदत्त रामराव सोंळूखे, राहणार गेवराई,रामचंद्र रंगानाथ गांगूर्डे राहणार अंबड यासह अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले असून तलवाडा पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सपोनि सोमनाथ नरके यांनी दिली आहे.तसेच हा प्रकार घडल्यानंतर गेवराई व आसपासच्या परिसरात नाका बंदी करण्यात आली होती तसेच गेवराई व तलवाडा पोलिसांनी मिळून सदरची कार्ययाई केली आहे 

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023