दोन गावठी हातभट्टीच्या अड्यावर पोलिसांनी कार्यवाही केली,२७२५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेवराई:-उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना एका खबरी द्वारे माहिती मिळाली की जव्हारवाडी,तुकानाईक तांडा खांडवी शिवारात अवैद्यरित्या गावठी हातभट्टी बनवून ती विक्री केली जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सदर माहिती गेवराई पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना दिली प्रवीणकुमार बांगर यांनी लगेच एक टीम ज्या मध्ये पीएसआय थोटे ए एस आय गरजे, पारधी मेजर सदर ठिकाणी पाठवले असता वरील दोन्ही ठिकाणी अवैद्यरित्या गावठी हातभट्टी बनवली जात असल्याचे निर्दशनात आले सदर ठिकाणी छापा टाकून दोन्ही ठिकान्यावरून २७२५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) गुरन 140/ 24 कलम 65 फ मुंबई दारूबंदी कायदा पोलीस दूर क्षेत्र मादळमोही हद्दीत जव्हारवाडी साठवण तलावाजवळ पाणीपुरवठा सार्वजनिक विहिरी शेजारी 21600/- रुपयाचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल मिळून आला आरोपी:- सरसाबाई उमाजी जाधव राहणार वडगाव
२) गुरन 143/23 कलम 65 फ प्रमाणे दारूबंदी कायदा तुकानाईक तांडा खांडवी शिवारात आरोपी नामे लहू कोंडीबा राठोड यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे गावठी हात्तभट्टीची रेड करून पाच 5650/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय थोटे, ए एस आय गरजे, पारधी मेजर यांनी केलेली आहे.