मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Monday, March 25, 2024

चकलांबा पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई ड्राय डे च्या दिवशी दोन अवैध दारू विक्रेत्यांवरती धाड.

Share it Please
चकलांबा पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई ड्राय डे च्या दिवशी दोन अवैध दारू विक्रेत्यांवरती धाड.


21740 रुपयाचा देशी विदेशी दारूचा मुद्द्यमाल  जप्त
 

चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे हे स्टाफ सह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना   त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राक्षस भवन फाटा ते राक्षस भवन जाणाऱ्या रस्त्यावरती एक इसम एका पत्रा शेडमध्ये देसी व विदेशी दारू विकत आहे  तसेच  कोळगाव ते तांदळा रोड वरती सार्थक बियर शॉपीच्या पाठीमागील बाजूस एक इसम दारूची अवैध   विक्री करत आहे. त्याप्रमाणे सापळा रचून दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी धाड  टाकली असता दोन्ही ठिकाणी बातमी प्रमाणे 21740 रुपये किमतीचा  मुद्देमाल  मिळाला असून तो जागीच जप्त करून आरोपीं 1) संदिपान सिताराम शेंबडे वय 38 वर्ष राहणार तांदळा तालुका गेवराई 2) राजेंद्र उर्फ नाना नाटकर राक्षसभवन तालुका गेवराई यास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून दारूबंदी कायदा कलम 65( इ) प्रमाणे कायदेशीर पोलीस ठाणे चकलांबा येथे गुन्हा दाखल केलेला आहे.
 सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक  रामेश्वर इंगळे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक  कुमावत., पोलीस कॉन्स्टेबल खटाणे चालक हवालदार जमादार यांनी केली आहे

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023