चकलांबा पोलिसांत दाखल झालेल्या गून्ह्यात पांडू चोराचा समावेश ?
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातून एक हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याची फिर्याद चकलांबा पोलिसांत दाखल झाली आहे चकलांबा पोलिसांची भूमिका याबाबद संशयास्पद जरी असली तरी या गून्ह्यात पांडू ? चोराचा समावेश होणार असल्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिसरात दहशत व दादागिरी करूण आपल्या शेताच्या काठावरूण गेल्या कित्येक वर्षापासून पांडूचोर?वाळूचे उत्खनन करत आहे तसेच यांची पुर्व कल्पना चकलांबा पोलिसांना आहे तसेच गेल्या आठ दिवसांपुर्वी चकलांबा पोलिसांत एक हजार ब्रास वाळू चोरीची फिर्याद दाखल झाली तरीही ठाणेदार एकइंचही जागेवरूण हालले नाहीत अंबडच्या तहसिलदार चंद्रकात शेळके यांनी गून्हा दाखल करूण सदरच्या गून्ह्यात पांडूचोर?यांचे नाव एक नंबरला टाकले आहे तसेच राक्षसभूवन परिसरात दादागिरी करूण हा माफिया स्वत;ला डॉन समजत आहे यांच्यावर आता कार्यवाईच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या असून याठिकाणी अनेक वाळू चोरांना प्रतिबंध करण्यात येणार आहे तसेच या गून्ह्यात कलम 395 लावण्यात येणार असल्याची माहिती असून पांडूचोर? यांचा देखील सदर गून्ह्यात समावेश होणार असून तो लवकरच जेलवारी करणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने दिली आहे.