खोकल्याचे औषध नाही दिल्या कारणाने उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या कानशीलात लावली.
तुम्ही तुमची मा... घा... पण मला खोकल्याचे औषध आणुन द्या
डॉक्टर बालाजी सुर्याभान नवले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० ३५३, भारतीय दंड संहिता १८६० ३२३,भारतीय दंड संहिता १८६० ५०४, भारतीय दंड संहिता १८६० ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात अपघात विभाग येथे डॉक्टर बालाजी सुर्याभान नवले ड्युटीवर असताना एक इसम रा.गेवराई त्याने मला सर्दी खोकला झाला असुन मला त्याचे औषध व गोळ्या द्या असे म्हणाला असता आम्ही त्यास रुग्णनोंदणी रजिस्टर नंबर. 1684 अन्वये नोंद घेवुन त्याला विचारपुस करून त्याला सर्दी खोकल्या च्या गोळ्या देण्यात आल्या.
त्या व्यक्तीने खोकल्याचे औषधाची बाटली मागितली असता आम्ही त्यास सद्या खोकल्याचे औषध अपघात विभागात नाही सकाळी ओ पी डी मधुन घ्या असे म्हणाल्याने त्याने मला तुम्ही तुमची मा... घा.... पण मला खोकल्याचे औषध आणुन द्या असे म्हणुन शिवीगाळ सुरु केली व मी त्यास शिवीगाळ का करतोस असे विचारले असता त्याने माझ्या कानाखाली दोन चापटा मारल्या त्यावेळी त्याला पकडण्यासाठी मंहेद्र दत्तत्रय भिसे (ब्रदर), संतोष रामदास भोटकर (कक्ष सेवक) यांनी त्यास धरून बाजुला केले. त्यानंतर तो शिवीगाळ करत निघुन गेला.
दिनांक 08.03.2024 रोजी 09.20 वाजताचे सुमारास कर्तव्यावर असताना इसम रा.गेवराई याने मला खोकल्याचे औषधाची बाटली मागितली असता आम्ही त्यास सद्या खोकल्याचे औषध अपघात विभागात नाही असे म्हणाल्याने त्याने मला शिवीगीळ करुन माझ्या कानाखाली दोन चापटा मारुन मी तुला बघुन घेतो असे म्हणून माझे कायदेशिर कर्तव्य पार पाडत असताना मारहाण केली म्हणुन माझी त्याचे विरुध्द कायदेशीर तक्रार करीत आहे.