हातभट्टीचा अड्डा उधवस्थ;चकलांबा पोलिसांची कामगिरी
एक आरोपी ताब्यात घेऊन गून्हा दाखल
गेवराई दि 12 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील फूलसांगवी परिसरात बनावट हातभट्टी चा अड्डा असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांना मिळाली तसेच त्यांनी सदर ठिकाणी पथक पाठवून कार्यवाई केली तसेच या कार्यवाईत चकलांबा पोलिसांनी विस हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले असल्याची माहिती असून एक आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, अंबादास गायवाड यांच्या राहत्या घरी हातभट्टी नामक रसायन तयार करून त्यांची विक्री करत आहे तसेच ही बनावट दारू आहे अशी माहिती गूप्त बातमीदाराने चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांना मिळाली तसेच त्यांनी आपल्या पथकाला सदर ठिकाणी कार्यवाई करण्याचे आदेश दिले चकलांबा पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून विस हजार रुपये कींमतीचे रसायन नष्ट करून वरील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तसेच चकलांबा परिसरात वाळू,डीजे,चंदन, अवैध धंद्यावर मोठ्या प्रमानात कार्यवाया सुरू आहेत तसेच चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे हे गून्हेगार तसेच अवैध धंद्यावाल्याचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जात असून सदरची कार्यवाई पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु ,यांच्या मार्गदर्शनाखालाली सपोनि नारायण एकशिंगे,पोउपनि रामेश्वर इंगळे, पो हे खटाणे यांनी केली आहे.