मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Friday, April 12, 2024

गेवराई:-मन्यारवाडी अंगावर विज पडून आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीररित्या जखमी

Share it Please
गेवराई:-मन्यारवाडी अंगावर विज पडून आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीररित्या जखमी
गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी शिवारातील घटना

गेवराई, (प्रतिनिधी):- आज शुक्रवार दि. १२ रोजी गेवराई शहर व परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारवाडी शिवारातील आपल्या शेतात आई व मुलगा शेती काम करत असताना आज दुपारी ४ च्या सुमारास त्यांच्या अंगावर विज पडली. या घटनेत मिना गणेश शिंदे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा ओंकार गणेश शिंदे (वय १५) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी मुलास गेवराई येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मन्यारवाडी येथील झालेल्या या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023