पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर एक्शन मोडवर: आता गुन्हेगारांची खैर नाही
गेवराई प्रतिनिधी: अवैध वाळु चोरी,घरफोडी,गुंडगिरी,सह कायदा सुव्यवस्थेला बांधा पोहचविणा-या समाज कटक यांच्या विरुद्ध नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी रणशिंग फुकत खाकीचा पावर दाखवण्यास सुरुवात करताच गुन्हेगार तालुका सोडून पळु लागले असल्याचे चित्र एकदरित निर्माण होऊ लागले आहे.दरम्यान गेल्या काही दिवसात पोलिस निरीक्षक बांगर हे एक्शन मोडवर येत, दिवसा ढवळ्या सोनाराला लुटणारी टोळी,अवैध वाळु वाहतुक करणारे माफिया ,शहरात असंतोष निर्माण करणारे टोळक्या सह अवैध दारु,मटका,पत्त्याचे कल्ब वर कारवाई करुन तब्बल ९२ गुन्हेगारांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करुन पोलिसांचे धाक गुन्हेगारात निर्माण करत शहरातील शांतता अबाधित ठेवली आहे. तसेच शहरासह पोलिस ठाण्याचे हद्दीत कुठेही अनुचित प्रकारसह कोणी दहशत निर्माण करत असल्यास थेट माझ्याशी सपंर्क करा आम्ही गुन्हेगारी मोडून काढू असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी केले आहे.
जानेवारी महिण्यात नव्याने गेवराई पोलिस ठाण्यात रजु झालेले पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी अवद्या दोन महिण्यात कधी न झालेल्या कारवाई करुन आपण गुन्हेगारांना भीक घालत नसल्याचे विविध कारवाईतून दाखवून दिले आहे. त्यांना येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरु यांचे विशेष मार्गदर्शनाखाली बांगर यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन महिण्यात २४ ठिकाणी बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला, तसेच गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळु वाहतुक करणारे वाळुु माफियांना सळो की पळो करुन सोडत ६ वाहनावर कारवाई करुन अवैध वाळु वाहतुकीला आळा घातला.पोलिस ठाण्याचे हद्दीत विविध ठिकाणी टोळक्या टोळक्या ने जुगाराचे डाव टाकून बसलेल्या जुगा-या विरुद्ध २० ठिकाणी दबंग कारवाई करत घडकी भरवली, शहरासह ग्रामीण भागात घरफोडी करुन पसार होणा-या चोरट्यांचे मुसक्या आवळत मालमत्तेचे पाच पैकी ४ गुन्हे ओपन करुन चोरट्यांना जेल ची हवा खाऊ घातली ,दिवसा ढवळ्या सोनारास लुटणारे टोळीचा पर्दाफाश करुन बेड्या ठोकले,तसेच शहरातील गुंडगिरी मोडून काढत मराठा आंदोलनासह विविध ठिकाणी चोक पोलिस बंदोबस्त ठेवून ,विशेष मोहिम राबवत मोटर वाहन कायदाखाली कारवाई करुन ४४४०० रुपयाचे दंड आकारुन कायदाचे पालन करण्याचे धडे दिले आहे.तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली तर सर्वच क्षेत्रातील विविध ठिकाणी डैशिंग कारवाई होऊ लागल्याने गुन्हेगार मध्ये पोलिसांची दहशत निर्माण होऊन लागली तर नागरिकां मध्ये देखील पोलीस कारवाईमुळे समाधान मानले जात आहे.तर गुन्हेगारी ला देखील आळा बसू लागल्याने गुन्हेगारी मोडून निघत आहे. दरम्यान दोन वर्षाच्या काळात गेवराई पोलिस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाला नसल्याने गुन्हेगारी फोफावली होती.परंतु आता पोलिस निरीक्षक बांगर यांनी गुन्हेगारा विरुद्ध जोरदार मोहिम राबवली असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडवणारे यांचे सळो की पळो झाली असून कोणी शांततेला बांधा आणत असेल तर त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सागत कुठेही अनुचित प्रकार सह कोणी दहशत निर्माण करत असल्यास थेट माझ्याशी सपंर्क करा आम्ही त्याचा बंदोबस्त करु असे अवाहन पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी केले आहे.