मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Monday, April 15, 2024

ड्रायडे च्या दिवशी चार ठिकाणी चकलांबा पोलिसांचा छापा.

Share it Please
ड्रायडे च्या दिवशी चार ठिकाणी चकलांबा पोलिसांचा छापा.

हजारो रूपयांची देशी विदेशी दारू जप्त.


🖊गेवराई दि 15 ( वार्ताहार ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त ड्रायडे असतांना उमापूर व फूलसांगवी परिसरात अवैध देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच त्यांनी छापा मारून त्याठिकाणी हजोरो रूपयांची दारू जप्त केली असून गून्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, उमापूर परिसरात हॉटेल मंत्रालय ,हॉटेल निवांत,व उमापूर फाट्यावरील एका पत्राच्या शेडमध्ये व फूलसांगवी येथील हातभट्टी अड्या देखील उदवस्त करण्यात आला आहे दारूबंदी असतांना व ड्रायडे असतांना देखील वरील हॉटेल चालक हे विनापरवाना दारूची विक्री करत असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांना गूप्त बातमीदाराने दिली त्यावरून त्यांनी आपल्या पथकाला सदर ठिकाणी कार्यवाई करण्याचे आदेश दिले सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापेमारी केली यामध्ये हजारो रूपयाची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून फूलसांगवी परिसतात हातभट्टी अड्यावरील विस हजार रूपये किंमतीचे रसायन देखील पोलिसांनी नष्ट केले आहे सदरची कार्यवाई पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस उपविभागिय अधीकारी नीरज राजगूरु,चकलांबा ठाणे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अंनता तांगडे, पोउपनि रामेश्वर इंगळे,पोउपनि कूमावत,पोकॉ तूकाराम पवळ,पो ह अमोल येळे,घोंगडे , पवार ,यांनी केली आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023