अमरसिंह पंडिताकडून युती धर्मांच पालन तर आ. लक्ष्मण पवारांची निष्ठा गेली कूठे?
गेवराई दि 18 ( वार्ताहार ) बीड लोकसभेची निवडणूक जाहिर झाली असून( दि15 मे ) रोजी यासाठी मतदान होनार आहे भाजपा कडून माजी मंत्री पंकजा गोपिनाथ मुंडे ह्या उमेदवार आहेत गेवराई मतदार संघातून त्यांना प्रचंड मताची आघाडी मिळवून देण्यासाठी भाजप सोबत मित्र पक्षात असलेले मा आ अमरसिंह पंडित यांनी आपली प्रतिष्ठा पनाला लावली आहे तर दूसऱ्या बाजूला ज्या पक्षाने आमदार केलं ज्या स्व गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारनात सक्रीय केले आणि आता त्यांची कन्या निवडणूकीच्या रिंगणात असतांना प्रचारात गेवराईच्या आ लक्ष्मण पवार यांनी पाठ फिरवली आहे त्यांची पक्षावरील निष्ठा गेली कुठे?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई मतदार संघात दोन दशकापुर्वी शिवाजीराव ( दादा ) पंडित परिवाराची पकड होती कालातराने राजकीय परिस्थिती बदलली आणि शहराच्या राजकारनात सक्रिय असनाऱ्या पवार परिवाराने तालूक्याच्या राजकारनात इंन्ट्री केली तसेच पक्ष हवा राजकारनात गॉड फादर पाहिजे असतो म्हणून स्व गोपिनाथ मुंडे साहेबांनी गेवराईत पंडित मुक्तीचा नारा दिला आणि आ लक्ष्मण पवार हे आमदार झाले ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले यामागे स्व गोपिनाथराव मुंडे साहेब याची किमया होती हे नाकारता येत नाही.
राज्याच्या राजकारनात बदल झाले आणि गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या स्वर्गवासानंतर गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांनी पक्षातील गटबाजी लक्षात घेता माजी मुख्यमंत्री देंवेद्र फडणविस यांच्या कळपात गेले माजी मंत्री पंकजा मुंडे आणि आ लक्ष्मण पवार यांच्यात राजकीय वैर झाले असल्याचेही चर्चा होती परंतू आ लक्ष्मण पवार यांना सन 2019 विधानसभेच्या निवडणूकीत पराभव करण्याचा डाव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रचला होता अशी देखील चर्चा आ लक्ष्मण पवार यांच्या समर्थकात होती परंतू आता लोकसभेची निवडणूक आली पुन्हा भाजपा सोबत राष्ट्रवादीचा गट आल्याने तसेच माजी आ अमरसिंह पंडित महायुतीत असल्यामुळे आ लक्ष्मण पवार यांची राजकीय गोची झाली आहे बीड लोकसभेच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडून देण्यासाठी गेवराईचे माजी आ अमरसिंह पंडित हे युती धर्मांच पालन करत आहेत तसेच स्व गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्यामुळे आमदार झालेल्या लोकांना पक्षाचा आणि निष्ठेचा विसर पडला की?काय असा देखील सवाल जनतेतून व्यक्त केला जात आहे.