दोन केन्यावर पोलिस आणि महसूल यांची संयुक्त कार्यवाई
7 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त;गेवराई पोलिसांत गून्हा दाखल
गेवराई दि 18 ( वार्ताहार ) तालूक्यातील म्हाळजपिंपळगाव परिसरातील गोदापात्रात केनीच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल व पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी महसूल व पोलिस यांनी छापा टाकला असता दोन ट्रॅक्टरसह केनी मिळून आल्या सदरच्या दोन्ही ट्रॅक्टर केनीसह जप्त करण्यात आल्या असून गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या कार्यवाईत 7 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून म्हाळज पिंपळगाव गणपती मंदिराच्या पाठीमागे असनाऱ्या गोदापात्रात केनीच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने गेवराई महसूल व पोलिसांना देण्यात आली होती त्या अनूषंगाने गेवराई महसूल व पोलिस यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता दोन लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर केनीच्या साह्याने वाळू उपसा करत होते तसेच रेड पार्टीला पाहून चालकाने पलायन केले आहे तसेच वरील मुद्देमाल जप्त करूण गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बाांगर ,तहसिलदार संदीप खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अशोक शेळके,मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले,तलाठी किरण दांडगे,कोतवाल कुदंन काळे,गजानन शिंगणे,पोलिस शिपाई शेखर हिंगावार यांनी केली आहे.