मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, April 13, 2024

चकलांबा पोलिसाची आणखी एका डीजे वर कारवाई

Share it Please
चकलांबा पोलिसाची आणखी एका डीजे वर कारवाई 
चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील दूरक्षेत्र उमापूर अंतर्गत मारुतीची वाडी या ठिकाणी डीजे वाजत असल्याबाबत व लोकांना रहदारीस  अडथळा निर्माण होत असल्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत  पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना माहिती मिळताच लगेच टीम रवाना करून सदर डीजेवर कायदेशीर कारवाई करण्याचे   आदेश दिले. त्यानुसार उमापूर पोलीस चौकी कडील नेमणुकीस असलेले कर्मचारी यांनी जाऊन सदर बाबत खात्री केली असता एक डीजे  क्रमांक एम एच 04 FD 7073 मारुतीची वाडी रोड वरती लोकास रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीमध्ये उभा असताना मिळून आला त्याच्या चालकाकडे  परवाना बाबत विचारपूस केली असता  त्याने उडवडीचे उत्तरे दिली गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेला. पोलिसांनी त्या डीजे चालक व मालकावरती कलम 188,283 प्रमाणे  पोलीस ठाणे चकलांबा  येथे गुन्हा दाखल केला आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023