खामगाव चेकपोस्टवर ईनोव्हा गाडीत एक
कोटी रूपये पकडले
सदर ईनोव्हा क्रमांक एम एच 23 ए डी 0366 या गाडीत रक्कम पकडले आहे.
रक्कम व्दारकादास मंत्री बँकेची आहे असे चालकाने सांगितले आहे.
रात्री ११ वाजेपर्यंत गेवराई तहसीलदार संदीप खोमणे, गेवराई नगर परिषद मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, इन्कमटेक्स विभागाचे अधिकारी चौकशी चालु होती.
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) सध्या लोकसभा निवडणूकीच्या अंनूषगाने प्रषासन अलर्ट मोडवर आहे तसेच आज ( दि 4 मे ) रोजी गेवराई तालूक्यातील खामगांव चेकपोस्टवर एका ईनोव्हा गाडीत एक कोटी रूपये रोख मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालूक्यातील खामगांव चेक पोस्टवर तपासणी करत असताना एम एच २३ एडी ०३६६ ईनोव्हा कार मध्ये पैश्याची लोंखडी पेटी असून त्यामध्ये एक कोटी रूपये मिळून आले आहेत सदर चालकांशी विचारपूस केली असता त्याने ही रक्कम व्दारकादास मंत्री बँकेची आहे असे सांगितले परंतू तसेच ही रक्कम संभाजी नगर शाखेतून बीड शाखेत घेऊन चाललो आहे तसेच ई एस एम एस आणि निवडणूक आयोगाचे बारकोर्ड नसल्या कारणाने पंचासमक्ष ही रक्कम साहय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार संदीप खोमणे यांच्या ताब्यात दिली आहे तसेच सदर रक्कमेची व चालकाची चौकशी सूरू असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली आहे.