मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, April 20, 2024

ग्रामीण भागात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ; चौका चौकात रंगू लागल्या गप्पा..

Share it Please
ग्रामीण भागात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ; चौका चौकात रंगू लागल्या गप्पा..
लोकसभेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

लोकसभा निवडणुकीचे वारे जिल्ह्यात वेगाने वाहू लागले आसून उष्मघाता प्रमाणे राजकीय वातावरण ही चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे,उमेदवार आणि नेते मंडळी पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार आणि जनतेच्या गाठीभेटी साठी तालुक्यातील गावागावात भेटी देवून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.मागील पाच वर्षाचा पाढा मतदारा समोर मांडून येणाऱ्या काळात  काय करता येईल याचे गणित मांडून लोकसभेच्या निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी करताना दिसतात यामध्ये तालुक्या तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली असून त्यांना आपली ताकत दाखवून देण्यासाठी मोर्चेबांधणी करावी लागत आहे. जनतेच्या अनेक प्रश्नांना समोर जावे लागत असून ग्रामीण भागात या लोकसभेमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार अशी चर्चा आता चौका चौकात रंगू लागल्याने निवडणुकीची रंगीत वाढत असून कोणाला विजयाचा गुलाल लागतो हे जनतेने दिलेल्या कौलावर अलंबून असणार आहे.
     बीड जिल्हात यावेळेस लोकसभेची निवडणूक ही चांगलीच रंगतदार आणि चुरशी ची होणार असल्याचे दिसत असून महायुती कडून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या उमेदवार म्हणून जनतेसमोर जानार आहेत तर माविकास आघाडी करून शेतकरी पुत्र म्हणून ज्यांची ओळख असणारे बजरंग सोनवणे हे उमेदवार म्हणून आपले अस्तित्व दाखवणार आहेत. जिल्ह्यात होणारी ही लोकसभेची निवडणूक ही येणाऱ्या राजकीय घडमोची नांदी ठरणार आहे.महाराष्ट्रात झालेले राजकीय फेरबदल,खासदार,आमदार यांनी केलेले पक्ष प्रवेश, पक्षाची झालेली राजकीय फोडाफोडी आणि सध्याचा मराठा समाजाचा जिव्हाळ्याचा मराठा आरक्षण प्रश्नावर लोकसभेच्या निवडणुकीत काय घडामोडी करणार हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे.भाजप,शिंदे सेना ,आणि अजित दादाची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस,शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांना आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व या लोकसभेत पणाला लागले असून आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल यावर नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.मागील दहा वर्षात जिल्ह्याच्या खासदार असणाऱ्या प्रीतमताई मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले हे त्यांनी जरी सांगितले असले तरी मागील पाच वर्षात त्यांच्या खासदार फंडातून कोणतेच काम झाले नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे त्यामुळे त्यांच्या बहिन पंकजाताई मुंडे यांना त्याचा मतदानात फटका बसेल हे ग्रहित धरुनच चालावे लागेल.तसेही जिल्ह्यात आज पर्यंत मुंडे भगिनींनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या नावानेच मते मागितली असून मतदारांनी ही लोकनेत्यांच्या कन्येला भरभरून प्रतिसाद देत मतदान केले आहे परंतु भाजप नेच त्यांना नकळत बाजूला सावरण्याचे काम मागील काळात केले हे त्यांनाही आणि जनतेलाही जाणवले.त्यावेळेस पंकजाताई निर्णय घेवून पक्ष सोडतील की काय अशी चर्चा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात होती परंतु त्यांनी वेळोवेळी संयम राखून सावध भूमिका बजावली.आणि या लोकसभेत महायुती कडून त्यांना खासदार प्रीतमताई मुंडे यांना बाजूला करून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत जिल्ह्यातील भाजप,शिंदेची शिवसेना आणि अजीप पवार यांच्या राष्ट्रवादी च्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून पंकजा ताईला निवडून आणण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लावले आहेत तर दुसरी कडे पंकजाताई च्या विरोधात महाविकास आघाडी कडून ज्योतीताई मेटे यांनी तिकीट भेटणार अशी जोरदार चर्चा असतांना शरद पवार गटात नव्यानेच प्रवेश करणारे पालकमंत्री धनंनज मुंडे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असल्याने ज्योटिताई मेटे यांच्या उमेदवारी चर्चेच्या विषयाला शरद पवार गटात पूर्णविराम मिळाला.त्यामुळे त्यांना वंचित कडून लोकसभा लढण्याची ऑफर देण्यात आली परंतु त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नसल्याने अखेर अशोक हिंगे यांचे नाव वंचित कडून जाहीर करण्यात आले असल्याने आता मेटे ताई यांची भूमिका कोणती असेल हे येणाऱ्या काळात स्पट होईल. महाविकास आघाडी कडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले बजरंग सोनवणे यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही चांगलीच मजल मारत जवळपास पाच ते साडेपाच लाख मत मिळवली होती शेतकरी पुत्र म्हणून जिल्ह्यात सहानुभिती मिळवत मतदार समोर जाऊन मते मागितली परंतु पराभव झाल्यावर परत ग्रामीण भागात त्यांनी संपर्क ठेवला नसल्याने आता परत त्यांना मतदार कितपत पसंती देतात हे या निवडणुकीत समोर येईल.कारण वेगवेगळे पक्ष,पक्षातील नेते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मागच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात जनतेसमोर आपली भूमिका मांडत होते तेच नेते आणि पदाधिकारी या लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारासाठी एका स्टेजवर येऊन जनतेच्या समोर येणार आहेत.

चौकट...
 अमरसिंह पंडित -  लक्ष्मण पवार पंकजाताईच्या परचारार्थ तर बदामराव पंडित बजरंग सोनवणे यांच्या करणार प्रचार...

गेवराई विधानसभा निवडणुकीत माजी आमदार आमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे परस्पर विरोधी होते विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी तालुका पिंजून काढून विधानसभा  विजया जवळ आणून ठेवली होती तर लक्ष्मण पवार यांनी ही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.परंतु या लोकसभेत अजित पवार गटात असणारे नेते अमरसिंह पंडित तर भाजप चे आमदार लक्ष्मण पवार यांना दोघांनी लोकसभेत पंकजाताई मुंडे यांचा  प्रचार करावा लागणार असल्याने हे दोन्ही तालुक्याचे नेते एकाच स्टेजवर दिसणार का? जर असे झाले तर विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे या विजयसिंह पंडित यांचा प्रचार करणार की लक्ष्मण पवार यांचा हा प्रश्न जनतेच्या चर्चचा विषय सद्या तालुक्यात आहे.तर उभाठा सेनेचे नेते बदामराव पंडित हे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या साठी तालुक्यात आपली मतदान रुपी ताकद दाखवतील...


मराठा समाजाची भूमिका निर्णायक ....

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष उभा केला आहे.त्यांनी  समाज प्रथम ही भूमिका मनात  ठेवून समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत शांत बसणार नसल्याचे शास ठणकावून सांगितले असल्याने मराठा समाज ही आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीरपने उभा असून या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मराठा समजला सहकार्य केले साथ दिली त्यांनाच मदत करू असे सूचक वक्तव्य केल्याने या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार हे निश्चित आहे.

३) जनतेच्या समस्या जैसे थे....

निवडणुका येतात आणि जातात परंतु जनतेच्या समस्या ह्या कायम समस्यांच राहतात कारण निवडणूक काळात दिलेली आश्वासने आणि शब्द हे निवडणुका झाल्या की उमेदवार आणि नेते विसरून जातात.त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देण्यात येते.मतदारांचे प्रश्न आणि समस्या ह्या जैसे थे राहतात त्यामुळे जनतेने आशेने निवडून दिलेले खासदार आणि आमदार हे जनेतला निवडणुका झाल्या की विसरून जातात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023