भैय्यासाहेब व लक्ष्मण अण्णा ची पंकजाताई साठी तर बजरंग बप्पासाठी आबा ची तगडी लॉबिंग
निवडणूक लोकसभेची परंतू पायाभरणी विधानसभेची
गेवराई दि 12 ( वार्ताहार ) बीड लोकसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी उद्या ( दि 13 मे साठी ) मतदान होणार आहे यामध्ये पंकजा मुंडे भाजप तर बजरंग सोनवणे राष्ट्रवादी कडून उभे आहेत मतदानाच्या बेरजेत कोण सरस ठरते या साठी गेवराई मतदार संघात तगडी लॉबिंग सुरू आहे पंकजाताई साठी माजी आ अमरसिंह पंडित तर विद्यमान आ लक्ष्मण पवार हे जोमात कामाला लागले आहेत तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी माजी मंत्री बदामराव पंडित यांनीही तगडी फिल्डिंग लावली आहे गेवराई मतदार संघात पक्षापेक्षा पंडित - पवार हेच पक्ष समजून कार्यकर्ते कामाला लागले आहेत तर या लोकसभेचा फायदा येनाऱ्या विधानसभा निवडणूकीत कूनाला होऊ शकतो हे पहाणे महत्वाचे आहे निवडणूक लोकसभेची जरी असली परंतू पंडित पवाराकडून विधानसभेची पायाभरणी सूरु आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड लोकसभा निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाची मालिका रंगली असून पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खा शरदचंद्र पवार यासह दिग्गज नेत्याच्या सभा बीड जिल्ह्यात गाजल्या आहेत तसेच वंचित आघाडी देखील यांनीही यामध्ये उडी घेतली वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याही सभा बीड जिह्यात झाल्यामुळे या लोकसभा निवडणूकीत रंगीत तालिम पहायला मिळाली मराठा आरक्षण यासह जातिवादाचा मुद्दा या निवडणूकीत प्रामुख्याने गाजला आहे मराठा, मुस्लिम, दलीत, मतावर कोण दावा करीत आहे यावर विजयी उमेदवार यांचे भविष्य अवलंबून आहे देशाच्या निवडणूकीचा प्रचार सर्वच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून जोमात सूरू आहे बेरजेच्या समिकरणात वंचित आघाडी किती मतदान घेईल.व यांचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल हे तर मतपेटी उघडल्या नंतरच लक्षात येईल.परंतू बीड लोकसभेचे गणित अद्याप कोणतेही राजकीय भविष्यकार सांगू शकत नाही अल्पशा मताने या निवडणूकीत उमेदवार विजयी होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.गेवराई मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गट कमकूवत आहे परंतू महा विकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ बदामराव पंडित पावरफूल आहेत तर बजरंग सोनवणे यांना जर मताधिक्य व आघाडी मिळाली तर निश्चित यांचे सर्वस्वी श्रेय हे माजी मंत्री बदामराव पंडित यांचे असेल तर पंकजाताई मुंडे यांना आघाडी मिळाली तर माजी आ अमरसिंह पंडित व आ लक्ष्मण पवार यांना हे श्रेय जाईल जो लोकसभेत जाईल यांचाच फायदा येणाऱ्या विधानसभेत होईल.म्हणून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे व गेवराई मतदार संघात कूनाला यांचा फायदा होतो हे आता येनारा काळच ठरवेल.