न पूछ की मेरी मंजिल कहा है; अभी तो सफर का इरादा किया है; न हारूंगा होसला चाहे कुछ भी हो जाये ये मैने किसी और से नहीं खुद से वादा किया है.रणवीर अमरसिंह पंडित....
आपल्या आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे नातू रणवीर अमरसिंह पंडित यांनी जयभवानी आणि जगदवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थांतर्गत कीडामहोत्सव घेऊन एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रणवीर पंडित म्हणतात माझ्या मातीतला एखादा तरी खेळाडू जागतिक पातळीवर चमकावा हे माझे स्वप्न आहे. आज मैदानावर खेळणारे हे विद्यार्थी पाहून त्यामधून एखादा तरी खेळाडू २०३२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळेल असे वाटते.
इंग्रजी माध्यमाच्या कॉन्वेंट स्कुल आणि परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही हा तरुण युवा नेता आपल्या मातीशी इमान राखून आहे. आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अत्यंत संयमी, शांत, चाणाक्ष आणि हुशार असेलल्या या युवकामध्ये आजोबा आणि वडिलांच्या राजकीय कारकीर्दीचा वारसा ठासून भरला आहे.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या शिक्षणाचा फायदा गेवराई तालुक्यातील तरुण खेळाडूंना झाला, जय भवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेवराईत तालुका स्तरावर क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, या क्रीडा महोत्सवात ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. शारदा स्पोर्ट्सअकॅडमीच्या माध्यमातून गेवराई शहरात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल या सारख्या क्रीडा प्रकाराचे नियमित मैदान सुरू असून तेथे शेकडो खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तेथे राष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे काम या युवा नेत्यांना केला आहे. प्रत्येक बारीक - सारीक गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी प्रचंड मेहनतीने यासर्व गोष्टी केलेल्या आहेत.
तरुणांनी करियर म्हणुन खेळाकडे पाहिले पाहिजे हे सांगताना त्यांनी तालुक्यातील एका सुरक्षा रक्षकाच्या मुलाला थेट राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळवुन दिली. फुटबॉल सारखा क्रीडा प्रकार ग्रामीण भागात रुजविताना त्यांनी पहिल्यांदा गेवराई येथे विभागीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली. गेवराईचा फुटबॉल संघ राज्यस्तरावर उत्तम कामगिरी करत नावलौकिक प्राप्त करून आला.
रणवीर (काका) पंडित यांनी स्वतः आपल्या कामाचा, शैलीचा ठसा फार कमी कालावधीत उमटविला आहे. राजकरण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांची कामगिरी झळाळून निघत आहे. अल्प अवधित लोकांना विशेषतः तरुणांना ते आपलेसे वाटत आहेत.
स्वप्नपूर्ती
रणवीर अमरसिंह पंडित परदेशात जावून क्रीडा विषयक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेवून आले. अनेकांना प्रश्न पडला या शिक्षणाचा आपल्याकडे उपयोग काय ? त्याचे उत्तर आहे. मा. श्री. अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात सुरु केलेली शारदा स्पोर्टस ॲकॅडमी सध्या रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बहारत आहे. त्यांनी लक्ष घातल्यामुळे गेवराई शहरात राष्ट्रीय दर्जाचे कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉलचे मैदान अस्तित्वात आले. महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा प्रशिक्षक गेवराईमध्ये डॉ. केतन गायकवाडच्या रुपाने कबड्डीचे प्रशिक्षण खेळाडूंना देत आहे. खो-खो साठी विजय जाहेर, व्हॉलीबॉलसाठी विजय आपसिंगेकर हे राष्ट्रीय खेळाडू दररोज जातीने खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. एकीकडे सोशल मिडीयाच्या गर्तेत बुडालेल्या तरुणांच्या हातून मोबाईल काढून त्यांना मैदानी खेळासाठी परावृत्त करणे अलिकडच्या काळात कठिण होत आहे. यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे आहेत हे ओळखून रणवीर पंडित यांनी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळातील क्रीडा शिक्षकांना जाणीवपूर्वक तयार केले. संस्थांतर्गत क्रीडा महोत्सव असेल किंवा शासन पातळीवरील क्रीडा स्पर्धा स्वतः मैदानावर हजर राहून या स्पर्धांकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे काम त्यांनी केल्यामुळे आज रिझल्ट मिळत आहेत.
रणवीर पंडित नियमितपणे शिवशारदा पब्लिक स्कुलच्या मैदानावर फुटबॉल खेळतात नव्हे स्वतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशारदा पब्लिक स्कुलचा संघ राज्य स्तरावर नावलौकिक मिळवू शकला. याच शाळेत रखवालादाराचे काम करणाऱ्या श्री. राठोड यांचा मुलगा अजय राठोड फुटबॉलच्या राष्ट्रीय संघात खेळला या माध्यमातून बीड जिल्ह्याचा पहिला फुटबॉलपट्टू राष्ट्रीय स्तरावर खेळला हे विशेष. रणवीर पंडित यांनी आयोजित केलेल्या संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवात आदित्य शिंदे या शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याने कबड्डीमध्ये उत्कृष्ट खेळ करत पारितोषिक मिळविले होते. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी त्याने गेवराईच्या मैदानावर कबड्डीमध्ये आपली कसब गेवराईकरांना दाखविली होती. आज तो प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटन या नामांकित संघात निवडला गेला आहे.
अजय राठोड फुटबॉल आणि आदित्य शिंदे कबड्डी हे दोन्ही गेवराईचे भुमिपूत्र वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत, याचे श्रेय नक्कीच रणवीर अमरसिंह पंडित यांना दिले पाहिजे. त्यामुळे आपल्या परदेशी शिक्षणाचा लाभ आपल्या भागातील लोकांना मिळाला पाहिजे असे काम माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचे नातू त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून करत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
त्यांना उज्वल भविष्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा...!
शेख जावेद सर गेवराई
ता.प्रतिनिधी दैनिक माझी नगरी,
मराठवाडा न्युज चैनल संपादक
9595713313