पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेक
गेवराई तालुक्यात पाण्याच्या टँकरमध्ये देखील घोटाळा !
ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी अंदोलन करणार - धम्मपाल कांडेकर
जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालणार का ?
गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात गेवराई येथून पाणीपुरवठा केला जातो परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे डिझेल वाचून अनेक टँकर वारंवार सतत उभे राहत असल्याचे पाहायला मिळत असल्याने या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.दरम्यान गेवराई तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमता होऊन घोटाळा आता होत असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.दरम्यान आता ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी तिव्र अंदोलन करण्यात येणार आसल्याचे पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून नागरिकांचे व मुक्या जनावरांचे हाल होत आहेत.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा योजना राबवली आहे.तालुक्यात जवळपास शंभर टँकरने पाण्याचा पुरवठा होत आहे.गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा करणारा ठेकेदार हा मनमानी कारभार चालवत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही.ठेकेदार हा टँकर मध्ये डिझेल टाकण्यासाठी टँकर मालकांना वेळेवर पैसे देत नाही त्यामुळे दोन चार दिवसाला एक वेळेस टॅंकर हे उभे असतात,याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत.दरम्यान तालुक्यात टॅंकरच्या पाण्यामध्ये देखील घोटाळा होत असताना तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी का गप्प बसत आहे असे देखील नागरिकांकडून आता बोलले जात आहे.दरम्यान ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ तिव्र अंदोलन करण्यात येणार आहल्याचे पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी सांगितले.
चौकट
गेवराई तालुक्यात टँकरचा महाघोटाळा होण्याची शक्यता !
सदरील ठेकेदार हा टँकर मालकांना डिझेलसाठी पैसे वेळेवर देत नसल्याने वारंवार टँकर हे उभे असतात.परिणामी ग्रामीण भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसून टँकरच्या फेऱ्याही कमी होतात.त्यामुळे लॉग बुक चेक करूनच ठेकेदाराचे बिल काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून मधून होत आहे.
चौकट
गेवराई येथील फिल्टर प्लंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो ते सर्व टॅंकर गेवराई येथील भगवान नगर भागात असलेल्या नगरपरिषदच्या फिल्टर प्लॅन पाणी टाकी इथून भरून जातात.तेथील गेटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला तर दिवसभरात कोणत्या गावात किती फेऱ्या होत आहेत हे कळू शकते.यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज वेळेवर पाणी मिळेल व ठेकेदारालाही चांगलीच चपराक बसेल.त्यामुळे गेवराईतील फिल्टर प्लॅनच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
चौकट
ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी तिव्र अंदोलन करणार - धम्मपाल कांडेकर
गेवराई शहरातील फिल्टर प्लॅन येथून ग्रामीण भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.या फिल्टर प्लांटच्या बाजूला समृद्धी पार्क आहे.या समृद्धी पार्क मधील नळ कनेक्शन या टँकरच्या ये जा करण्याने सतत लिकेज होऊन तुटतात.त्यामुळे या जागी मोठा खड्डा पडलेला असून दि.१६ रोजी रात्रभर एक टँकर त्यात फसून राहिला होता तेव्हापासून दि. १७ रोजी पर्यंत त्या तुटलेल्या नळावाटे लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन दुष्काळात एवढे पाणी वायाला गेले याला जिम्मेदार कोण ? तर ठेकेदारांनी आधीच लक्ष घातले असते तर लाखो लिटर पाण्याची नासाडी वाचली असती.दरम्यान ठेकेदाराला ताळ्यावर आणण्यासाठी तिव्र अंदोलन पाण्याच्या टाकीजवळ करणार असल्याचे पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे युकक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी सांगितले.