मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, July 16, 2024

मंजूर झालेला उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंत रस्ता नाल्यांसह तात्काळ करावा.

Share it Please
मंजूर झालेला उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंत रस्ता नाल्यांसह तात्काळ करावा. 
वंचित नागरिकांना सोबत घेऊन रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला 

 गेवराई (प्रतिनिधी) दि.१६ तालुक्यातील मौजे उमापूर ता.गेवराई जि.बीड येथील उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंतचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता नाल्यांसह अनेक महिन्यांपासून मंजूर आहे. मात्र मंजूर असलेला रस्ता व नाल्यांसह केला नसल्याने माटेगाव, खळेगाव, कुंभेजळगाव, भाट अंतरवली या गावांना जोडणारा हा रस्ता  पूर्णत: चिखलमय झाल्याने वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने चिखलातून सटकल्याने अनेक अपघात झाले आहेत. तसेच याच रोडवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना पायी चालने मुश्कील झाले आहे. तर अनेक चारचाकी वाहने जात असतांना चाक पाणी साचलेल्या खड्यात गेल्यास शाळेत व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या अंगावर चिखल पाणी उडण्याचे प्रकार रोजच होत आहे. मंजूर असलेला रस्ता तात्काळ करन्यात यावा.
 अन्यथा वंचित बहुजन आघाडी दि.२५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकशाही मार्गाने उमापूर येथील नागरीकांना सोबत घेऊन गेवराई - शेवगाव रोडवरील उमापूर फाटा येथे रास्ता रोको करेल याची नोंद शासनाने घ्यावी असा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची स्वाक्षरीने तहसिलदार मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, पोलिस अधिक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 यावेळी तहसिलदार यांना निवेदन देतांना ज्ञानेश्वर हवाले ता. प्रसिद्धी प्रमुख, राजाभाऊ पोकळे युवा नेते,  यशवंत कापसे ग्रा.पं सदस्य, भारत हवाले, वसिम शेख, मुबारक शेख, देवेंद्र कापसे, रामदास मोरे,सुरेश गायकवाड उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023