मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Sunday, September 15, 2024

उपविभागीय अधिकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणकुमार बांगर यांची धडाकेबाज कार्यवाई

Share it Please
उपविभागीय अधिकारी नीरज राजगूरू यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रवीणकुमार बांगर यांची धडाकेबाज कार्यवाई

१८ नव्या कोऱ्या तलवारी पोलीसांनी घेतल्या ताब्यात, आरोपी जेरबंद
===================
गेवराई दि. 15 : अवैध मार्गाने विक्री साठी आणलेल्या १८ नव्या कोऱ्या तलवारी गेवराई पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह ताब्यात घेऊन मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार ता. १४ रोजी रात्री ३ वाजता पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक करून अठरा तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात असून, कायदा सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्यां समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक. प्रविणकुमार बांगर यांनी सांगितले आहे. दरम्यान, अवैध हत्यारे विक्री करणे आणि त्या घेणे कायद्याने गुन्हा असून, या मार्गाने जाणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर असल्याची माहिती आहे. 
  
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी भगवान फकीरा पवार हा अवैध मार्गाने तलवारी आणून विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस अधिकारी आरोपीचा पिच्छा करीत होते. मात्र, आरोपी गुंगारा देत होता. लोकेशन मिळत नव्हते. शनिवार ता. १४ रोजी आरोपीचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह, १८ नव्या कोऱ्या तलवारी  ,दुचाकी वाहन जप्त करून, आरोपीला जेरबंद केली आहे.  पोलीसांनी केलेल्या कारवाईने बीड जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांना मिळालेल्या गोपनिय माहितीने, गेवराई येथील पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर  यांनी  १४.०९.२०२४ रोजी २३-०० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर त्रिमुर्ती हॉटेल जवळ पाडळसिंगी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी  भगवान फकीरा पवार [ वय ४० वर्ष रा हिरापुर ता गेवराई जि बीड ]  यास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेत. सपोनि दिपक लंके यांच्या फिर्यादीवरुन कलम ४/२५ आर्म ॲक्ट १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविपोअ नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोनि. प्रविणकुमार बांगर, सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, सपोनि सचिन कापुरे , पोउपनि शिवाजी भुतेकर, अशोक शेळके, श्रीमंत उबाळे बन, सुरेश पारधी, कडाजी मदने, रामेश्वर काकडे, परळकर , तांदळे , विकास सांळुके, रेंगे बन, श्रीधर सानप, अंगद पिंपळे, विजय परजणे, प्रल्हाद देवडे,  रामनाथ उगलमुगले,  सुनिल राठोड,  महेद्र ओव्हाळ,  प्रदिप पिंपळे, होमगार्ड कांबळे, अनिल ढाकणे, महिला होमगार्ड शर्मा, कोकाट,  शितल सोळुंके यांनी कारवाई केली आहे. सदरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी भूतेकर करीत आहेत. आरोपी कधी आणि कुठून अवैध मार्गाने तलवारी आणतो आणि विक्री करतो. या संदर्भाने गेवराई पोलीस कसून शोध घेणार आहेत. पोलीसांची करडी नजर असून, गुन्हेगारांची खैर नाही. अशी चर्चा होऊ लागली आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023