मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Monday, October 28, 2024

चकलांबा पोलिसांची गांजाच्या शेतीवर मोठी धडाकेबाज कारवाई, १२० किलो गांजाची झाडे जप्त.एक्कीविस लाख रू. मुद्देमाल घेतला पोलीसांनी ताब्यात.

Share it Please
चकलांबा पोलिसांची गांजाच्या शेतीवर मोठी धडाकेबाज कारवाई, १२० किलो गांजाची झाडे जप्त.एक्कीविस लाख रू. मुद्देमाल घेतला पोलीसांनी ताब्यात.
गेवराई प्रतिनिधी÷गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील पौवळाची वाडी शिवारात एका शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली होती.त्यावरून त्यांनी आज दिनांक २५ ऑक्टोबर२०२४ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा मारला असता या ठिकाणी शेतात एकूण १२० लहान – मोठी गांजाची झाडे सापडली असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथे या परिसरातील गट क्रमांक ४७२ मध्ये गांजा या अमली पदार्थांची झाडे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केली जात आहे अशी माहिती चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणाची गोपनीय पाहणी करून आज शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता अचानक आपल्या पथकासह छापा मारला असता शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे लावण्यात आली होती. यामध्ये झाडांची अंदाजे वजन १२७ किलो आहे.तसेच,अंदाजे एकूण किंमत २१,००,००० /- रुपये (एक्कीविस लाख रु.) हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदरील आरोपीला चकालांबा पोलीसांनी अटक केली आहे. तसेच, सदरची कारवाई बीड पोलीस अधीक्षकअविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील , पोउपनि पानपाटील, पोउपनि अनंता तांगडे , पोउपनि कुमावत, पोह.अमोल येळे,पोह.प्रधान , खेडकर, कुलकर्णी,गुजर, घोंगडे, पवळ यांनी केली आहे. तरी या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असुन अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणाणले आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023