मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, January 30, 2025

जिल्हा नियोजन समिती आमदार विजयसिंह पंडित व आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share it Please
जिल्हा नियोजन समिती आमदार विजयसिंह पंडित व आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार चा वादा,निधी कमी पडू देणार नाही.

बीड : बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले. अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. अजित पवार यांनी पालकमंत्री पार पाडायच्या जबाबदाऱ्यांसोबत आता बीड जिल्ह्यातील राजकीय बांधणीसाठीचेही नियोजन केले असल्याची चर्चा सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या दोन आमदारांना धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या 2 सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सदस्य समितीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना टाळण्यात आले आहे.

 

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023