मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, May 5, 2026

नवीन शासन निर्णय नुसार दि. १५ मे २०२६ पूर्वी सर्व पात्र अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करण्याचे निर्देश:-माजी आ अमरसिंह पंडि

Share it Please

नवीन शासन निर्णय नुसार दि. १५ मे २०२६ पूर्वी सर्व पात्र अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करण्याचे निर्देश:-माजी आ अमरसिंह पंडित


गेवराई(जिल्हा प्रतिनिधी शेख जावेद सर):- शहरातील संजयनगर, इस्लामपुरा, साठेनगर, संतोषनगर, संघमित्रनगर, भीमनगर, कोरबू गल्ली, चिंतेश्वर गल्ली, अचानकनगरसह आदी भागांतील अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर वाटप करण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आज माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा केली. दि. १५ मे २०२६ पूर्वी सर्व पात्र अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करण्याचे निर्देश यावेळी बैठकीत दिले.

गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना हक्काचा पीटीआर वाटपाचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. अतिक्रमण धारकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती देऊन शहरातील सुमारे २२२० भूखंड धारकांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यास दि. ३०.१०.२०२५ रोजीच्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्याचे काम यापूर्वी झाले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र झालेल्या सर्व अतिक्रमण धारकांना भोगवटदार वर्ग-२ मधून वर्ग-१ करून त्यांना हक्काचा पीटीआर देण्याची प्रक्रिया नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ संथ झाली होती. आज या बैठकीत याबाबत तपशिलाने सविस्तर चर्चा झाली. दि. १५ मे रोजी राजस्व अभियान गेवराईमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये सर्व अतिक्रमण धारकांना पीटीआरचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे यांसह महायुती सरकारने दि. २५.०३.२०२६ रोजी याबाबत नवीन शासन निर्णय करून जानेवारी २०११ पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पक्की घरे आणि वाणिज्य प्रयोजनासाठीची अतिक्रमणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाच्या नवीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने अतिक्रमण धारकांनी पुराव्यासह नगरपालिकेत अर्ज दाखल करावेत, प्राप्त अर्जांवर छाननी व इतर प्रक्रिया करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करून सर्व अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवरील सर्व पुरावे ग्राह्य धरण्याचा आग्रह या बैठकीत केला. यापूर्वी झालेल्या बैठकीतील पात्र अतिक्रमण धारकांना वगळले असल्यास संबंधितांना कारणांसह लेखी पत्र द्यावे असे निर्देशही या बैठकीत दिले आहेत.

बैठकीला माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव, गेवराई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विक्रम मांडुरके, नायब तहसीलदार श्री. संजय सोनावणे, श्री. प्रदीप पुरी, नगररचनाकार श्री. आकाश राठोड, अभियंता श्री. रामेश्वर कर्डिले, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. जाधव, माजी नगराध्यक्ष श्री. महेश दाभाडे, नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते श्री. शेख खाजा, नगरसेवक श्री. दादासाहेब घोडके, झोपडपट्टी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. कडूदास कांबळे, श्री. श्रीकृष्ण मुळे, श्री. सतीश प्रधान, श्री. सदाफुले पाटील, श्री. जफर पटेल, श्री. प्रकाश गायकवाड यांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023