गेवराई नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव,
आ.पंडित विरूद्ध माजी.आ पवार विरुद्ध माजी आ. पंडित
माजी आमदार अमरसिंह पंडित यांची भुमिका ही निर्णायक ठरणार आहे
गेवराई(जिल्हा प्रतिनिधी शेख जावेद सर)गेवराईत पंडित- पवार-पंडित आ.विजयसिंह पंडितराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चाचपणी सुरू केली आहे.माजी आमदार लक्ष्मण पवार यांचा कडून गेवराई भाजपा च्या महिला अध्यक्ष सौ. रत्नमाला शरद मोटे यांच्या नावाची चर्चा करत आहेत
शिवसेना उबाटा कडुन परत सौ गिरिकाताई बदामराव पंडित यांची नावाने चर्चाही होतं आहे.
गेवराई नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने आ.विजयसिंह पंडीत यांची मोर्चा बांधणी नियोजन करताना दिसून येत आहे तर माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाजपाच्या कडून पवार घराण्याचा विश्वासू गेवराई तालुक्या भाजपाच्या महिला अध्यक्ष सौ.रत्नमाला शरद मोटे यांच्या प्रमुख नावावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उबाटा कडुन सौ.गिरिकाताई पंडित यांचा गेवराई शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आहे त्यामुळे उबाटा कडुन गिरिकाताई बदामराव पंडित तर भाजपाकडून रत्नमाला शरद मोटे आ.विजयसिंह पंडित कडून कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र गेवराई नगर परिषद निवडणुकीत तिरंगी लढत होतांना दिसत असुन बरेच घडामोडी घडणार आहे माजी आमदार अमरसिंह पंडित यांची भुमिका ही निर्णायक ठरणार आहे असेही नागरिक कडून चर्चा करत करत आहे .
गेवराई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक मध्ये इतिहास बदल होणार असल्याचे संकेत शहरात विविध ठिकाणी चर्चाही केली जात आहे
बदामराव पंडित यांचा उमेदवारी व भाजपाचे उमेदवारी कार्यकर्ते मिळणार का ?
आ.विजयसिंह पंडित यांचा अध्यक्ष पदावर उमेदवारी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे अवचित्याचे ठरेल.